सहकार भारती महानगर नूतन कार्यकारणी जाहीर
अध्यक्षपदी शशिकांत राजोबा, महामंत्रीपदी शैलेश पवार, संघटन प्रमुखपदी संदीप कुलकर्णी यांची निवड

सांगली प्रतिनिधी :- सहकार भारती सांगली महानगर शाखेच्या नूतन कार्यकारीणीची घोषणा करण्यात आली. रविवार दि.२७ एप्रिल रोजी सांगलीतील स्व.म.ह तथा अण्णा गोडबोले सभागृह येथे कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सहकार भारतीचे प्रदेश संघटन प्रमुख शरद जाधव, सांगली अर्बन बँकेचे अध्यक्ष आणि सहकार भारतीचे प्रदेश कोषाध्यक्ष गणेशराव गाडगीळ, प्रदेश संपर्क प्रमुख संजय परमणे, विभाग प्रमुख चंद्रकांत धुळप होते. तसेच ग्रामीण अध्यक्ष सुमंत महाजन, महानगर अध्यक्ष शशीकांत राजोबा, तासगाव अर्बनचे अध्यक्ष महेश्वर हिंगमिरे, सहकार भारतीचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुभाषचंद्र मालाणी यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक महानगर अध्यक्ष शशीकांत राजोबा यांनी केले. यानंतर गणेशराव गाडगीळ, संजय परमणे, शरद जाधव यांनी उपस्थितांना सहकार भारतीची स्थापना आणि कार्य याबद्दल मार्गदर्शन केले. विभाग प्रमुख चंद्रकांत धुळप यांनी नूतन कार्यकारिणी जाहीर केली. नूतन पदाधिकारी यांचा यावेळी सत्कार करणेत आला. कार्यकारिणी खालील प्रमाणे अध्यक्ष – शशिकांत राजोबा, उपाध्यक्ष – किशोर शहा, अनिल मगदूम, श्रीकांत मगदूम, महामंत्री – शैलेश पवार, संघटन प्रमुख – संदीप कुलकर्णी, सचिव- एडव्होकेट अमोल बोळाज, सहसंघटन प्रमुख- सुषमा कुलकर्णी, महिला प्रमुख- उत्कर्षा लाडे, महिला सहप्रमुख- स्वाती सावळवाडे, कोषाध्यक्ष- बाळासाहेब खुडे, बँक प्रकोष्ठ प्रमुख- सागर घोंगडे, सहप्रमुख सागर बिरनाळे, अनिल बिरजे, पतसंस्था प्रकोष्ठ प्रमुख- एन.जे.पाटील, सहप्रमुख- धीरज नसलापुरे, पगारदार पतसंस्था प्रमुख- सतीश सावंत, सहप्रमुख- धनाजी हेगडे, ग्राहक संस्था प्रकोष्ठ प्रमुख श्रुती जोशी, सहप्रमुख पृथ्वी कांबळे, गृहनिर्माण प्रकोष्ठ – एडव्होकेट मंदार देशपांडे, सहप्रमुख श्रीशैल्य कोठावळे, बचतगट प्रकोष्ठ प्रमुख – संपदा आरवाडे, सहप्रमुख गीतांजली टेके, विकास सोसा प्रकोष्ठ प्रमुख – सुरेश गायकवाड, सहप्रमुख शशिकांत चौगुले, मत्स्य प्रकोष्ठ प्रमुख अतुल बावधनकर, साखर कारखाना प्रकोष्ठ प्रमुख – मधुकर पाटील, सनदी लेखापाल प्रकोष्ठ प्रमुख सी.ए सलील लिमये, विधी प्रकोष्ठ प्रमुख सुनेत्रा रजपूत, आय.टी प्रकोष्ठ प्रमुख मधुकर डुबल, प्रसिद्धी प्रमुख अवधूत ठोके, ऑडिटर प्रकोष्ठ प्रमुख सुरेश कोरे, मल्टीस्टेट प्रकोष्ठ परशराम कदम, सदस्य – अण्णासाहेब पाटील, कुमार पाटील, वसंत सूर्यवंशी, अशोक जाधव, सी.एस.कुलकर्णी, महानंदा शेटे. यावेळी ग्रामीण कार्यकारिणी पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन स्वाती सावळवाडे यांनी केले. आभार भारत निकम यांनी मानले.