सांगली अर्बन बॅंक निवडणुकीत गणेशराव गाडगीळ यांच्या नेतृत्वाखालील स्व. अण्णासाहेब गोडबोले प्रगती पॅनेलचा एकतर्फी विजय

विरोधी बापुसाहेब पुजारी बॅंक बचाओ पॅनेलचा दारुण पराभव

सांगली प्रतिनिधी :- सांगली अर्बन को – ऑप बॅंकेत सलग दुसऱ्यांदा विद्यमान सत्ताधारी गटाचे स्व. अण्णासाहेब गोडबोले प्रगती पॅनेलने वर्चस्व मिळवले. १६ जागांवर एकतर्फी विजय मिळवला. विरोधी बापुसाहेब पुजारी बॅंक बचाओ पॅनेलचा दारुण पराभव झाला. सत्ताधारी गाडगीळ पॅनेलला दहा हजार तर विरोधी पुजारी पॅनेलला अडीच हजारच्या दरम्यान मते मिळाली. सत्ताधारी गटाचे डॉ. रविद्र आरळी यापुर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत. सत्ताधारी गटाने विजय स्पष्ट झाल्यानंतर जल्लोष साजरा केला. सांगली शहरातून मिरवणूक काढली . बॅंकेसाठी मिरज येथील शेतकरी भवनात मतमोजणी झाली. पहिल्या फेरीत सत्ताधारी गटाला साडेतीन हजार विरोधी गटाला पाचशे ते सातशे, दुसऱ्या फेरीत सत्ताधारी गटाला सात हजार विरोधकांना दोन हजार तर तिसऱ्या फेरीत सत्ताधारी गटाच्या उमेदवारांना दहा ते सव्वादहा हजार तर विरोधी गटाला अडीच ते दोन हजार सहाशे मते मिळाली. सत्ताधारी गटाचे सर्व म्हणजे १६ उमेदवार विजयी झाले. सत्ताधारी गटाला विजय निश्‍चित झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी सांगलीतील आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालया समोर जल्लोष केला. बॅंकेचे विद्यमान अध्यक्ष गणेशराव गाडगीळ, आमदार सुधीर गाडगीळ, शेखर इनामदार, नवनिर्वाचित संचालक अनंत मानवी, हणमंतराव पाटील, श्रीपाद खिरे, संजय पाटील, शैलेद्र तेलंग, संजय धामणगावकर, सागर घोंगडे, रणजित चव्हाण, कालिदास हरिदास, सतीश मालू, रवींद्र भाकरे, मनोज कोरडे, अश्‍विनी आठवले, स्वाती करंदीकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी शहरातील प्रमुख मार्गावरून मोटारसायकल फेरी काढली. बॅंकेसाठी गेली दहा दिवस प्रचारात आरोप-प्रत्यारोप झाले. बॅंकेचे कार्यक्षेत्र सांगली, कोल्हापूर जिल्ह्यासह मराठवाड्यातील परभणी, जालना, बीड, लातूर, हिंगोली जिल्ह्यात आहे. बॅंकेचे ६० हजार सभासद, ३५ शाखा आहेत. त्यामध्ये मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर, सांगली, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, उदगीर, कुर्डुवाडी, बार्शी, माजलगाव, परतुर, वसमत, मानवत आदींचा समावेश आहे.

विजयी उमेदवारगणेशराव गाडगीळ, अनंत मानवी, हणमंतराव पाटील, डॉ. रवींद्र आरळी (बिनविरोध), श्रीपाद खिरे, श्रीकांत देशपांडे, संजय पाटील, शैलेद्र तेलंग, संजय धामणगावकर, सागर घोंगडे, रणजित चव्हाण, कालिदास हरिदास, सतीश मालू, रवींद्र भाकरे, मनोज कोरडे, अश्‍विनी आठवले, स्वाती करंदीकर.