महायुतीचे उमेदवार आ.सुधीर गाडगीळ यांचा उमेदवारी अर्ज दाखल

सांगली प्रतिनिधी :- सांगली विधानसभा मतदार संघातील भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी आज (दि.२४) रोजी जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहल किनिचे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माजी आमदार दिनकर पाटील, नितीन शिंदे, माजी आमदार रमेश शेंडगे, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेखर इनामदार, शिवसेना जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष पद्माकर जगदाळे, भाजपा नेते मुन्ना करणे, नीताताई केळकर, किसान मोर्चा उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार, जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, सरचिटणीस अविनाश मोहिते आदी मान्यवर तसेच भाजपा महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.