कादंबरीकार विश्वास पाटील लिखित ‘ अण्णा भाऊंची दर्दभरी दास्तान ‘ ग्रंथाचे पुणे येथे प्रकाशन

पुणे :- अक्षरधारा बुक गॅलरी,राजहंस प्रकाशन यांच्या वतीने आयोजित,कादंबरीकार विश्वास पाटील लिखित ‘अण्णा भाऊंची दर्दभरी दास्तान’ या लोकशाहीर व साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावरील ग्रंथाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक डॉ.श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते झाले. यावेळी ज्येष्ठ हिंदी साहित्यिक जितेंद्र भाटिया, ज्येष्ठ साहित्यिक आणि दलित पँथरचे संस्थापक अर्जुन डांगळे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी,राजहंस प्रकाशनचे संपादक शिरीष सहस्त्रबुद्धे, सुबोध मोरे, रमेश राठिवडेकर उपस्थित होते.