चिंतामणराव महाविद्यालयात ए.आय टेक्नॉलॉजीवर व्याख्यान संपन्न

सांगली प्रतिनिधी :- चिंतामणराव व्यापार महाविद्यालय येथे AI in Commerce या विषयावर सोमवार दि. 16 डिसेंबर रोजी श्री. दिनेश कुडचे यांचे व्याख्यान संपन्न झाले. यावेळी श्री. दिनेश कुडचे यांनी ए.आय टेक्नॉलॉजीचा वापर कॉमर्स आणि मॅनेजमेंट मध्ये कसा करायचा याचे विस्तृत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा.ओंकार हातेकाट यांनी केले तसेच वक्त्यांचा परिचय प्रा. सुनील कोपर्डे यांनी करून दिला. अध्यक्षीय मनोगत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शार्दूल ठाकूर यांनी केले. सूत्र संचालन स्वाती निरलगी यांनी केली. आभार प्रा.वर्धमान भिलवडे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. गजानन नागरगोजे, कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.