“जैन कासार भूषण महिला उद्योजकता ” पुरस्काराने श्रीमती उषा कुत्ते सन्मानित.

सांगली प्रतिनिधी :- श्रीमती उषा रविंद्र कुत्ते यांना “ जैन कासार भूषण महिला उद्योजकता “ पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. भारतीय जैन कासार समाज संघटना, सांगलीचे संस्थापक अध्यक्ष पोपटलाल डोरले यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. सांगली गॅस सर्विसेस व रवींद्र ट्रान्सपोर्टच्या संचालिका श्रीमती उषा रविंद्र कुत्ते यांना भारतीय जैन कासार समाज संघटनेचे संस्थापक पोपटलाल डोरले व सांगली शाखेचे अध्यक्ष सागर घोंगडे, सन्मती महिला मंडळाच्या अध्यक्षा माधुरी गरगट्टे यांच्या हस्ते ” जैन कासार भूषण महिला उद्योजकता पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे वेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या पुण्यतिथी निमित्त श्री. ईश्वर रायण्णावर यांचे “ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ” या विषयावर व्याख्यान झाले. यानंतर महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ संपन्न झाला. यावेळी सन्मती महिला मंडळाच्या सदस्या व जैन कासार समाजातील पदाधिकारी बंधू-भगिनी उपस्थित होते. सांगली जिल्हा जैन कासार समाज संघटनेच्यावतीने यावर्षीपासून सांगली जिल्ह्यातील कर्तृत्ववान महिलांसाठी कासार भूषण महिला उद्योजकता पुरस्कार देण्यास सुरुवात केली आहे. तसेच वर्षभरात विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात. याप्रसंगी सुहास काटकर, किरण मांगले, महावीर मांगले, आनंद वणकुद्रे, विजय कासार तसेच सौ. सुनीता मांगले, सौ. शिल्पा गरगट्टे, सौ.वैशाली केंबळे इत्यादी उपस्थित होते.