गोवा येथील कराटे स्पर्धेत सावरकर प्रशालेचे यश

गोवा येथे कराटे स्पर्धेत उत्तीर्ण झालेले खेळाडू.

सांगली प्रतिनिधी :-वर्ल्ड (मॉडर्न) शोतोकान कराटे फेडरेशन इंडिया या संस्थेच्या वतीने मडगाव (गोवा) मनोहर पर्रिकर स्टेडियम येथे नॅशनल कराटे स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत स्वा. सावरकर प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. या कराटे स्पर्धेसाठी स्वा. सावरकर स्पोर्टस् ॲण्ड मार्शल आर्ट विश्रामबाग सांगलीचे बक्षीस घेतलेले खेळाडू- प्रथम क्रमांक- श्रीराम भादुले, दैविक शेट्टीगर, विश्वराज कोकणे, श्रुती घाडगे. द्वितीय क्रमांक- संदीप घोरपडे, आयुष कोळेकर, आराध्या शिंदे, आदित्य साळुंखे. या स्पर्धेचे आयोजन संस्थेचे चिफ इन्स्ट्रक्टर स्टिफन शक्ती यांनी केले होते. वर्ल्ड (मॉडर्न) शोतोकान कराटे फेडरेशन इंडिया या संस्थेचे अध्यक्ष जसपाल सिंग व अनुप देठे यांच्या उपस्थिती स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तरप्रदेश, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, लखनौ, गुजरात, बेंगलोर आदी राज्यातून ७०० खेळाडूंनी भाग घेतला. या सर्व विद्यार्थ्यांना स्वा. सावरकर प्रतिष्ठान प्रशाला या संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार नामजोशी, प्रज्ञा प्रबोधिनीचे मुख्याध्यापक सुबोध कुलकर्णी, अभिनव बालक मंदिरचे मुख्याध्यापक महादेव कुंभार यांचे प्रोत्साहन मिळत आहे. या कराटे विद्यार्थ्यांना सुनिता पगडे यांचे मार्गदर्शन मिळत आहे.