हेलीओस रायफल अँड पिस्टल शूटिंग अकॅडमी’चे उद्घाटन.

सांगली प्रतिनिधी :- ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये मोठी क्षमता आहे. त्यांना योग्य प्रशिक्षण मिळाल्यास ते निश्चितच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यशस्वी होतील. असे प्रतिपादन चंदू चॅम्पियनचे रिअल हिरो मुरलीकांत पेटकर यांनी सांगलीतील हेलिओस रायफल अॅण्ड शुटिंग अकॅडमीच्या शुभारंभ प्रसंगी केले. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, अकॅडमीचे अध्यक्ष संजय परमणे, नाना यादव यांची प्रमुख उपस्थिती होती. मुरलीकांत पेटकर पुढे म्हणाले की, पालकांनी मुलांना वयाच्या 15 वर्षापर्यंत खेळाचे स्वातंत्र्य द्यावे, अमूक एकच खेळ खेळावे याचे बंधन लादू नये. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदके कमी मिळाल्याची खंत व्यक्त केली. यासाठी सर्वसामान्य स्तरातून खेळाडूंची निवड करुन त्यांना प्रशिक्षण दिल्यास निश्चितच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ते यशस्वी होतील. यावेळी त्यांनी उपस्थित पालकांशी व खेळाडूंशी संवाद साधला. या अकॅडमीमधून चांगले खेळाडू निर्माण होतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. यावेळी बोलताना आमदार सुधीर दादा गाडगीळ यांनी आजच्या क्रिडा युगात रायफल आणि पिस्टल शूटिंगचे महत्त्व वाढले आहे, असे नमूद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अकॅडमीचे अध्यक्ष संजय परमणे यांनी केले. या अकॅडमीमुळे खेळाडूंना रायफल व पिस्टल शुटींगसाठी आता पुण्या मुंबईला जावे लागणार नाही. तसेच या अकॅडमीत विघ्नेश यादव, सूरज अरवत्तू, तुकाराम कैकाडी असे तज्ज्ञ प्रशिक्षक असणार आहेत. यावेळी विविध स्पर्धेत विजेत्या खेळाडूंचा मुरलीकांत पेटकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या अकॅडमीची उभारणी नाना यादव यांनी केली आहे. या कार्यक्रमाला अॅड. समीर पटवर्धन, शैलेश पवार, अनिल कुलकर्णी, सतीश सावंत, समीर कुलकर्णी, अनेक खळाडू, पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.