सांगली जिल्हा माहिती अधिकारीपदी संप्रदा बीडकर रुजू

सांगली प्रतिनिधी :- सांगली जिल्हा माहिती अधिकारीपदी संप्रदा बीडकर या शुक्रवार दि.३० ऑगस्ट रोजी रुजू झाल्या. संप्रदा बीडकर यांनी माहिती अधिकारी फारुख बागवान यांच्याकडून पदभार स्वीकारला. संप्रदा बीडकर यांच्याकडे सध्या नाशिक विभागाचा पदभार आहे. फारुक बागवान हे कोल्हापूर जिल्ह्याचे माहिती अधिकारी म्हणून काम करीत होते. त्यांच्याकडे सांगलीचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. सांगली जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.