अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद सांगली शाखेची कार्यकारणी घोषित.

सांगली प्रतिनिधी :- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा – सांगली यांची संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत आणि अत्यंत उत्साहात पार पडली .रविवार, दि.१६ जून रोजी टिळक स्मारक मंदिर सांगली येथे , नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखा मुंबईचे निरीक्षक संदीप पाटील, आणि गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत सन २०२४ ते २०२९ साठी कार्यकारिणीची बिनविरोध निवड झाली. अ.भा.मराठी नाट्यपरिषद सांगली शाखेची नूतन कार्यकारिणी (२०२४ ते २०२९) पुढीलप्रमाणे, अध्यक्ष- प्राचार्य डॉ. भास्कर ताम्हणकर, उपाध्यक्ष- सौ. अंजली भिडे, प्रमुख कार्यवाह- श्री.विशाल कुलकर्णी, सहकार्यवाह- सौ.अपर्णा गोसावी, कोषाध्यक्ष- श्री.प्रशांत जगताप, संचालक – श्रीनिवास जरंडीकर, प्रशांत गोखले, सचिन पारेख, कुलदीप देवकुळे, रामचंद्र कोटणीस, मकरंद कुलकर्णी. नव्याने निवड झालेल्या कार्यकारिणीने पुढील कार्यकाळात नाट्यपंढरी सांगलीमध्ये सांस्कृतिक क्षेत्रात अनेक दर्जेदार कार्यक्रम, शिबिर, व्याख्यानमाला, मनोरंजनात्मक कार्यक्रम असे अनेक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर; साधारण साडेपाचशे सभासद असणाऱ्या शाखेमधील सर्वच सभासदांना बरोबर घेऊन परिषदेचा नाव लौकिक वाढविणार असल्याची भावना नवनियुक्त परिषदेचे अध्यक्ष भास्कर ताम्हणकर यांनी व्यक्त केली. या प्रसंगी नियामक मंडळाचे सदस्य मुकुंद पटवर्धन ,चंद्रकांत धामणीकर , तसेच राजेंद्र पोळ ,भालचंद्र चितळे, सनीत कुलकर्णी, डॉक्टर दयानंद नाईक, रामकृष्ण चितळे विजयराव कुलकर्णी आणि परिषदेचे सभासद उपस्थित होते. अशी माहिती शाखेचे प्रमुख कार्यवाह विशाल कुलकर्णी यांनी दिली.