सहकार भारतीच्या पापड महोत्सवास उस्फुर्त प्रतिसाद

सांगली प्रतिनिधी :- सहकार भारती, सांगली महानगर आणि जिल्हा शाखा व आदिआरिहंत अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी यांचे संयुक्त विद्यमाने दि.२२ ते २३ मार्च रोजी कच्छी जैन भवन, सांगली येथे भव्य पापड महोत्सवास उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. तसेच आदिआरिहंत अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी यांचे वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिर व मोफत नेत्र तपासणी शिबिर यांचे आयोजन करण्यात आले होते. या पापड महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा उपनिबंधक श्री. मंगेश सुरवसे साहेब यांचे शुभहस्ते झाले. यावेळी आदिआरिहंत अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष आदिनाथ नसलापुरे, क्रेडाई महाराष्ट्रचे जॉइंट सेक्रेटरी रवींद्र खिलारे, सहकार भारतीचे महामंत्री शैलेश पवार, जिल्हा प्रचार व प्रसिद्धी प्रमुख संदीप कुलकर्णी, जिल्हा महामंत्री भारत निकम, धीरज नसलापुरे, बाळासाहेब खुडे, अमोल बोळाज, महिला पदाधिकारी सौ. उत्कर्षा लाडे, सौ. सारिका मुळे, सौ. संपदा अरवाडे, सौ. सुषमा कुलकर्णी, श्रुती जोशी आदी उपस्थित होते.