प्रा. योगिता संजय परमणे यांना पी.एच.डी पदवी प्राप्त


सांगली प्रतिनिधी :- विलिंगडन महाविद्यालयातील प्राध्यापिका सौ. योगिता संजय परमणे यांनी शारीरिक शिक्षण विषयातील पीएचडी (विद्यावाचस्पती) पदवी शिवाजी विद्यापीठाकडून प्राप्त केली शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी शिर्के यांनी प्रमाणपत्र प्रदान केले. यावेळी उपस्थित गाईड डॉ. अभिजीत वनीरे, पीजीबीयुटीआर प्रमुख डॉ. सोयम व अधिसभा सदस्य संजय परमणे. प्रकुलगुरु डॉ.पी.एस पाटील, अधिष्ठाता डॉ.श्रीकृष्ण महाजन व डॉ.मेधा गुळवणी, क्रीडा विभाग प्रमुख डॉ.शरद बनसोडे इत्यादींनी त्यांचे अभिनंदन केले. सौ.योगिता परमणे यांनी प्लायोमॅट्रिक व सॅंड प्रशिक्षणाचा व्हॉलीबॉल खेळातील स्मॅश मारणे या कौशल्यातील उंच उडी तंत्रावर होणारा परिणाम अभ्यासणे हा प्रबंध शिवाजी विद्यापीठास सादर केला. बी.ओ.एस चेअरमन डॉ.महेंद्र कदम पाटील, उपप्राचार्य डॉ.सुनील चव्हाण, प्राचार्य डॉ. बी.एन उलपे, एक्स्टर्नल एक्सपर्ट डॉ.संदीप औताडे इत्यादींचे त्यांना मार्गदर्शन लाभले. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे डॉ. विश्राम लोमटे तसेच विलिंगडन महाविद्यालयाचे प्राचार्य यांचे सहकार्य लाभले. सौ.योगिता परमणे यांनी १९९५ साली शिवाजी विद्यापीठाच्या हॉलीबॉल संघाचे नेतृत्व पांडेचारी येथे झालेल्या वेस्ट झोन स्पर्धेमध्ये केले होते.