जिल्हा मध्यवर्ती बँकेचे गुलाबराव पाटील यांना जयंतीदिनी अभिवादन

सांगली प्रतिनिधी :- महाराष्ट्राच्या सहकार चळवळीतील अग्रणी लोकनेते आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चौफेर विकासाचे शिल्पकार सहकार तीर्थ,माजी खासदार गुलाबराव पाटील यांची १०४ वी जयंती जिल्हा बँकेच्या वतीने श्रध्दापूर्वक साजरी करुन गुलाबराव पाटील यांच्या सहकार क्षेत्रातील व विशेषकरून ग्रामीण विकासातील भरीव कामगिरीला उजाळा देऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक पृथ्वीराजबाबा पाटील, वैभव शिंदे, मानसिंग को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन जेके बापू जाधव व बँकेचे एमडी वाघसाहेब यांच्या हस्ते बँकेच्या प्रांगणातील गुलाबराव पाटील साहेब यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी उपाध्यक्ष बाळासाहेब गुरव, ऋतुराज पाटील, बिपिन कदम,नितीन तावदारे, आप्पासाहेब पाटील, प्रा. एन.डी.बिरनाळे, शैलेश पवार, अख्तर मुजावर, देवाबापू शिखरे, आनंदराव पाटील, अमोल कदम, सनी धोतरे , महावीर पाटील, विजय बसर्गी, डॉ. प्रताप भोसले, आयुब निशाणदार, रघुनाथ नार्वेकर, बाळासाहेब पाटील, सागर मुळे, विजय पाटील, हारूण पठाण, संजय मोरे, कयूम शेख, सलीम पन्हाळकर, रवींद्र वळवडे, मनोज लांडगे, अरविंद जैनापुरे, विश्वास माने, प्रकाश माने, महावीर पाटील इनाम धामणी, टी डी पाटील बिसूर, आनंदराव पाटील, विश्वासराव माने, प्रकाश माने, शितल सदलगे, माजी नगरसेवक बाळासाहेब काकडे, मयुरेश पेडणेकर, चिंतामणी सहस्त्रबुद्धे, अभी सूर्यवंशी, रमेश शेख, आनंदराव पाटील, शंकर माने, समीर मोमीन, श्री. देवधर , अजय लोखंडे, दिलीप कांबळे, लालसिंग देशमुख, तनुजा सोलकर, संतोष लोखंडे, किरण वाघमोडे, अमोल खराडे, रवींद्र पवार, प्रमोद शेट्टी, गजानन नलवडे, मौला वंटमुरे पैगंबर शेख, विद्याधर पाटील, विजय पाटील, जयवंत खोत, प्रशांत अहिवळे, एडवोकेट विजय चव्हाण व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.सांगली काँग्रेस कमिटी, मार्केट कमिटी, पुणे व सांगली जिल्हा सहकार बोर्ड व पृथ्वीराज पाटील यांच्या यशोधन सेवा व संपर्क कार्यालयातही प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन गुलाबराव पाटील यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.