वीराचार्य पतसंस्थेची शुन्य टक्के एन.पी.ए ची परंपरा कायम

सांगली प्रतिनिधी :- संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये मंदीसदृश्य वातावरण असताना, ऊस, द्राक्ष उत्पादनात, दरातील घसरणीसारख्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुध्दा सभासद, ग्राहकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे चालू आर्थिक वर्षात संस्थेस ७ कोटी १९ लाखांचा ढोबळ नफा झालेला आहे. अशी माहिती संस्थेचे चेअरमन डॉ. अजित पाटील यांनी दिली. संस्था एकत्रित ५५३ कोटी व्यवसायाचा टप्पा पार करीत आहे या वैभवशाली ऐतिहासिक कामगीरीबद्दल चेअरमन डॉ. अजित पाटील यांनी सर्व सभासद ग्राहकांचे अभिनंदन करून कृतज्ञता व्यक्त केली आहे. संस्थेचे मार्गदर्शक संचालक शशिकांत राजोबा, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेनच्या महासचिवपदी कार्यरत असलेने त्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली संस्थेची निरंतर प्रगती पथाकडची वाटचाल सुरू आहे. संस्थेकडे एकूण ३२२ कोटी १९ लाख ठेवी असून २३० कोटी ७८ लाखाचे कर्ज वाटप केले आहे. संस्थेचे भागभांडवल ११ कोटी ४ लाखाचे झाले असून एकूण स्वनिधी ३५ कोटीचा झालेला आहे. संस्थेने शिल्लक रक्कम विविध बँकामध्ये १५४ कोटीची गुंतवणूक केली आहे. अनेक अडचणींच्या पार्श्वभुमीवर कर्जदार सभासदांनी केलेल्या उदंड सहकार्यामुळे वसुली सक्षम रीत्या होवून ३१ मार्च रोजीच शुन्य टक्के एन पी एची परंपरा कायम राखण्यात संस्थेस यश आले आहे. वर्षाअखेर संस्थेस ७ कोटी १९ लाखाचा ढोबळ नफा झालेला आहे. संस्था सांगली जिल्हा कार्यक्षेत्र घेवून कार्यरत असून २५ शाखांच्या माध्यमातून कार्य विस्ताराबरोबर ग्राहक सेवेचा नवा मापदंड घालून अत्याधुनिक सोयी सुविधेसह संस्था ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरली आहे. संस्थेच्या या विकासात्मक वाटचालीमध्ये व्हा. चेअरमन अरुण कुदळे, तसेच सर्व संचालक, सल्लागार सदस्य, सभासद, ग्राहक व व्यवस्थापक शितल मसुटगे यांचेसह सर्व सेवकांचे योगदान लाभत आहे.