मोदी सरकारच्या विरोधात काँग्रेस जय भारत सत्याग्रह करणार – पृथ्वीराज पाटील

सांगली प्रतिनिधी :- मोदी सरकारच्या विरोधात जय भारत सत्याग्रह यशस्वी करण्याचा निर्णय दि.८ रोजी काँग्रेस कमिटीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील हे होते. यावेळी पृथ्वीराज पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या निवडणुकीआधी आणि नंतरही मोठमोठी आश्वासने दिली, पण त्यांची पुर्तता केली नाही. त्याचबरोबर देशात दररोज अनेक घोटाळे होत असून हे घोटाळेबाज मोकाट आहेत. त्यांच्यावर कारवाई न करता विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या मागे तपास यंत्रणा लावलेल्या आहेत. यावर प्रामुख्याने कॉंग्रेस पक्ष आवाज़ उठवणार आहे. सरकारच्या कार्यशैली वर बोट ठेवणाऱ्या विरोधी पक्षांतील नेत्यांची,पत्रकारांची मुस्कटदाबी सरकार करत आहे. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करून देशातील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या कॉंग्रेसची मुस्कटदाबी सरकार करत आहे पण तरीही देशातील जनतेसाठी कॉंग्रेस आवाज उठवत राहील आणि लोकशाही व्यवस्था नष्ट होवू देणार नाही.ते म्हणाले, या महिना अखेरपर्यंत जिल्ह्यात सर्वत्र चौक सभा घेवून अदानींच्या आर्थिक भानगडी, घटनात्मक व वित्तीय संस्थांना निर्माण झालेला धोका, महागाई , बरोजगारी, शिक्षण, आरोग्य , मोदी – शहांनी पूर्ण न केलेली आश्वासने इत्यादींबद्दल जनजागृती केली जाणार आहे, तसेच विविध गोष्टींचा जाब विचारणारी पत्रे नागरिकांकडून त्यांना पाठविली जाणार आहेत . जिल्हा संघटक आशिष कोरी यांनी राष्ट्रीय सरचिटणीस तथा पश्चिम महाराष्ट्र प्रभारी सोनलजी पटेल यांनी पुणे येथील बैठकीत जय भारत सत्याग्रहाबाबत दिलेली माहिती यावेळी दिली. ब्लॉक अध्यक्ष बिपीन कदम यांना चौक सभांच्यासाठी समन्वयक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. मिरजमधील सभांचे नियोजन ब्लॉक अध्यक्ष संजय मेंढे करणार आहेत, तर कुपवाड येथील सभांचे नियोजन सनी धोतरे करणार आहेत . १५ ते २० एप्रिलदरम्यान जय भारत सत्याग्रह सभा घेतली जाणार असून त्यांतर जिल्हाधिकारी कार्यालयास घेराव घातला जाणार आहे. बैठकीला गजानन आवळे व मिलिंद माने यांनी कॉंग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. यावेळी आशिष कोरी, विरोधी पक्षनेते संजय मेंढे, बिपीन कदम, सनी धोतरे,नगरसेवक तौफ़ीक़ शिकलगार, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले, माजी नगरसेवक मधुकर कोष्टी व अजित दोरकर, अमित पारेकर, महादेव साळूंखे, सुहेल बलबंड, मौला वंटमोरे, पैगंबर शेख, नामदेव चव्हाण, उत्तम सुरर्यवंशी, अय्यूब निषानदार, राजेंद्र कांबळे, दत्तू बनसोडे, विश्वास काळे, श्रीनाथ देवकर,ताजूद्दीन शेख , मंदार काटकर , महावीर पाटील , नंदकुमार शेळके , चेतन कांबळे , ज्ञानेश्वर शिंदे, शितल सदलगे , गौरव गायकवाड , विजय आवळे , अमित कांबळे , प्रशांत कांबळे, प्रवीण कांबळे , केतन कांबळे , सचिन कांबळे, संजय शिंदे, गजानन आवळे, सौरभ कांबळे ,अमोल हर्ष, हर्षल होवाळे, विश्वभूषण श्रीवास्तव, मिलिंद माने, रमेश मद्रासी, निखील कांबळे, संजय कांबळे, रूपेश कांबळे, नटराज कांबळे, किरण देवकुळे, अमित बस्तवडे, सचिन चव्हाण, अशोकसिंग राजपूत, बाबगोंडा पाटील, सुधीर जवळेकर आदी उपस्थित होते .