सैनिकनगर येथे अंतर्गत रस्ते डांबरीकरण कामाचे उद्घाटन

सांगली प्रतिनिधी :- राज्याचे माजी जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांनी महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधा पुरवणे यासाठी १० कोटी निधी दिला आहे, या निधिमधून आज (दि.२७) रोजी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका प्रभाग क्रमांक ८ मधील सैनिकनगर येथील अंतर्गत रस्ते डांबरीकरण करणे या कामाचे उद्घाटन महापौर दिग्विजय सूर्यवंशी, नगरसेवक विष्णू अण्णासाहेब माने व नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दत्ता क्षीरसागर, सावंता माळी, रावसाहेब पाटील, आनंद सावंत, अजित चव्हाण,गणेश माने, बापू भोसले, अंजना पवार, वंदना ताटे, विजया देसाई, अमित नाईकवडे, डॉ. अमर पागे, पांडुरंग भोसले, रवी कोळी, सुनीता जाधव, श्री.आवटे ,सुरेश मोरे, बाळू माने, काकासाहेब जाधव, बबन दळवी, गणेश धोत्रे आदी उपस्थित होते.