वाटेगाव येथील अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक उभे राहील – आमदार सुधीर गाडगीळ

सांगली प्रतिनिधी :- साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथील स्मारकाला अर्थ संकल्पीय अधिवेशनात 25 कोटी रुपयाचा निधी मंजूर झाल्याबद्दल आमदार सुधीर गाडगीळ यांचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर येथे मातंग समाजातील जेष्ठ नागरिक सुधाकर आवळे, प्रकाश आवळे, संजय कांबळे यांच्या हस्ते या परिसरातील मातंग समाज बांधवांतर्फे जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना आमदार सुधीरगाडगीळ म्हणाले, महाराष्ट्रातील शिंदे- फडणवीस यांच्या नेतृत्वा खालील भाजपा सेनेच्या सरकारने गेल्या नऊ महिन्यात महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचे, शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, कामगारांचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. तसेच अनेक योजना सुरू केले आहेत. तसेच त्यांच्या कल्याणासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी 25 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला असून लवकरच या ठिकाणी भव्य स्मारक उभे राहील. तसेच सांगली शहरात देखील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी भविष्यात निधी उपलब्ध करून दिला जाईल. यावेळी भाजपा अनुसूचित मोर्चाचे शहराध्यक्ष अमित भोसले, मातंग समाज चेतना परिषदेचे जिल्हाध्यक्ष अभिमन्यू भोसले, सुजित राऊत, अविनाश मोहिते, भाजपा अनुसूचित मोर्चाचे मंडलाध्यक्ष विकास आवळे, भाजपा व्यापार आघाडीचे उपाध्यक्ष आनंद चिकोडे, सुरज माळी, राहुल माळी, राजू मगदूम, अक्षय कांबळे, राजू मद्रासी, संदीप आवळे, राजू सांगळे आदी उपस्थित होते.