सहकार भारतीतर्फे जनकल्याण पतसंस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांचा सत्कार

कराड :- जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी बिनविरोध फेरनिवड झालेले चंद्रशेखर देशपांडे आणि संस्थेचे उपाध्यक्ष अभिजीत चाफेकर यांचा सहकार भारती, सातारा जिल्ह्याच्या वतीने सत्कार करण्यात आला.सहकार भारतीचे सातारा जिल्हाध्यक्ष डॉ. रवींद्र भोसले यांनी चंद्रशेखर देशपांडे यांचा, तर संघटक शाम झोरे यांनी अभिजित चाफेकर यांचा शाल, सातारी कंदी पेढे, पुष्पगुच्छ व अभिनंदनपर पत्र देऊन सत्कार केला.जनकल्याण पतसंस्था सातारा जिल्ह्यातील विश्वासार्ह पतसंस्थांपैकी एक असून, आपल्या कामातून सहकार क्षेत्रासाठी दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरली आहे. सत्काराबद्दल श्री. देशपांडे आणि श्री. चाफेकर यांनी सहकार भारतीचे आभार मानले. केंद्र सरकारने सहकार क्षेत्रासाठी स्वतंत्र सहकार मंत्रालय स्थापन केले असून, त्याची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे आहे. सरकार सहकार क्षेत्राच्या विकासाकडे विशेष लक्ष देत असताना सहकारी संस्थांना एकत्र आणण्यासाठी आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सहकार भारती करत असलेले कार्य कौतुकास्पद आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी संस्थेच्या संचालिका सौ. पूनम वास्के यांचादेखील यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी सहकार भारतीचे कोल्हापूर विभाग संघटक चंद्रकांत धुलप, जिल्हा महामंत्री शैलेश ढवळीकर, सातारा तालुका प्रमुख सागर जंगम, सहसंघटक गणेश डुबल, सातारा जिल्हा महिला सहप्रमुख सौ. शर्मिला श्रीखंडे आणि कराड येथील कृष्णाकाठ इन्स्टिट्यूट फॉर स्किल डेव्हलपमेंट अँड रिसर्चचे संचालक सुधीर कुलकर्णी उपस्थित होते.
