सहकार संवाद कार्यक्रमात रिझर्व बँक संचालक सतीश मराठे यांचे मार्गदर्शन
सहकार भारती सांगली जिल्हा (ग्रामीण) नूतन कार्यकारणी घोषीत.

पलूस प्रतिनिधी :– सहकार भारती स्थापना दिनानिमित्त सहकार संवाद कार्यक्रम व सहकार भारती सांगली जिल्हा (ग्रामीण) यांच्या नूतन कार्यकारणी ची घोषणा करण्यात आली. पलूस येथील रविवार दि. 26 जानेवारी रोजी येथील पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर विद्यालय येथे हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भारतीय रिझर्व बँकेचे संचालक व सहकार भारतीचे संस्थापक सदस्य सतीशजी मराठे यांनी महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेतील सहकाराचे स्थान या विषयावर विस्तृत मार्गदर्शन केले. यावेळी सहकार भारतीचे माजी प्रदेश अध्यक्ष प्रा.मुकुंदराव तापकीर, प्रदेश संपर्क प्रमुख संजय परमणे, विभाग प्रमुख चंद्रकांत धुळप, प्रदेश कार्यकारिणी सदस्य व तासगाव अर्बन बँकेचे अध्यक्ष महेश्वर हिंगमिरे, श्री.उदय परांजपे आणि श्री.संदीप माळी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि परिचय संग्राम कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन सारिका मुळे यांनी केले. या कार्यक्रमास पलूस तालुक्यातील विविध सहकारी संस्थांचे संचालक आणि पदाधिकारी उपस्थित होते.
नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे – अध्यक्ष – सुमंत महाजन, उपाध्यक्ष – सर्वश्री सतिश भिंगे, संदीप माळी, महामंत्री – भारत निकम, कोष प्रमुख – चंद्रकांत खंकाळे, प्रसिद्धी प्रमुख – प्रशांत कुलकर्णी, संघटन प्रमुख – संग्राम कुलकर्णी, सह. संघटन प्रमुख – आनंदराव निकम, महिला प्रमुख – सारीका मुळे , महिला सह प्रमुख – स्नेहलता कुलकर्णी, संस्था संपर्क प्रमुख – अजितराव खराडे, पतसंस्था प्रकोष्ठ प्रमुख – जगदीश कालगावकर,सह प्रमुख – पोपटराव चौथे, बँक प्रकोष्ठ प्रमुख – श्रीकांत कुलकर्णी, विकास सेवा सोसायटी प्रकोष्ठ प्रमुख – विठ्ठल निकम, आडीट प्रकोष्ठ – दत्ता स्वामी, गृहनिर्माण प्रकोष्ठ प्रमुख – श्रीशैल कोठावळे, सदस्य – सागर जाधव, लक्ष्मण चव्हाण, शिवप्रसाद शेंडे, डॉ.प्रदीप कोरे, कृष्ण कुलकर्णी यांची निवड झाली.