पालकमंत्री कार्यालयाद्वारे महापालिका परिसरात योजना साक्षरता व सेवा सुविधा शिबिराचे आयोजन

सांगली :– पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या कार्यालयाद्वारे सर्वसामान्य नागरिकांसाठी आयुष्यमान भारत योजना, जुन्या मतदार ओळख पत्रा वरून नवीन मतदार ओळखपत्र काढणे, आभा कार्ड, पदवीधर निवडणूक मतदार नोंदणी ,सार्वत्रिक निवडणूक मतदार नोंदणी, ई श्रम कार्ड नोंदणी, आधार कार्ड काढणे अथवा दुरुस्त करणे पॅन कार्ड काढणे अथवा दुरुस्ती, बांधकाम कामगार नोंदणी ,उद्यम आधार नोंदणी, इत्यादी सेवा या शिबिरात द्वारे नागरिकांना मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या. प्रभाग क्रमांक 11 व प्रभाग क्रमांक 15 मध्ये नुकतीच अशी शिबिरे घेण्यात आली. याला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. प्रभाग 11 मध्ये सदर शिबिराचा आयोजन भाजप सांगली शहर जिल्हा अनुसूचित जाती जमाती उपाध्यक्ष सुजित कुमार काटे व निळकंठ साळुंखे यांनी केले, तर भाग 15 मध्ये या शिबिराचे आयोजन गजानन नलवडे, पापा बागवान, विक्रम सावर्डेकर यांनी केले. या शिबिराला आमदार सुधीर दादा गाडगीळ, नीता केळकर, यांच्यासह अनेक भाजप वरिष्ठ नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी भेट दिली.