मनाच्या मशागतीसाठी कार्यशाळेचे महत्व अबाधित – अतुल पेठे

सांगली प्रतिनिधी :- रंगसंगत’ नाट्य प्रशिक्षण कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा सांगली आयोजित ‘रंगसंगत नाट्य प्रशिक्षण कार्यशाळेचे उदघाट्न करण्यात आले. सुरवातीला नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. भास्कर ताम्हणकर यांनी स्वागत प्रस्ताविक केले. उदघाट्न प्रसंगी कार्यशाळेचे मुख्य प्रशिक्षक महाराष्ट्रातील ख्यातनाम रंगकर्मी अतुल पेठे म्हणाले की, रंगभूमी विषयी नीट माहिती व्हावी. मनाच्या मशागतीसाठी कार्यशाळेचे महत्व अबाधित आहे. तसेच, रंगकर्मीनी सातत्य आणि शिस्त यांचे पालन करणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगितले. नियामक मंडळ कार्यकारिणी सदस्य संदीप पाटील, चंद्रकांत धामणीकर यांनीही मनोगत व्यक्त करत उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी, ख्यातनाम दिग्दर्शक अभिनेते प्रदीप वैद्य, दिग्दर्शक- प्रकाशयोजनाकार अभिजीत झुंजारराव, दिग्दर्शक अभिनेता आशिष वाघमोडे, ओंकार गोवर्धन, नाटककार डॉ. अरुण मिरजकर हे प्रशिक्षक म्हणून पाच दिवस जबाबदारी सांभाळणार आहेत.संजय भोकरे इन्स्टिट्यूट ऑफ फिल्म मीडिया अँड आर्ट्स राम मंदिर या ठिकाणी ही कार्यशाळा चालू आहे यावेळी, नियामक मंडळ कार्यकारिणी सदस्य मुकुंद पटवर्धन यांच्यासह सांगली नाट्य परिषद शाखेचे कोषाध्यक्ष प्रशांत जगताप, उपाध्यक्ष अंजली भिडे, सहकार्यवाह अपर्णा गोसावी, श्रीनिवास जरंडीकर, प्रशांत गोखले, सचिन पारेख, कुलदीप देवकुळे, मकरंद कुलकर्णी, संजय कोटणीस इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशांक लिमये यांनी केले. या कार्यशाळेचे प्रमुख नियोजन नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह विशाल कुलकर्णी करीत आहेत.