शिवाजी विद्यापीठामधील महाविद्यालयांमध्ये दि.१५ ऑक्टोबर रोजी शिवचरित्र वाचनाचा अनोखा उपक्रम – अधिसभा सदस्य संजय परमणे

संजय परमणे – अधिसभा सदस्य

सांगली :- दि.१५ ऑक्टोबर रोजी माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या जयंती दिवशी दरवर्षी महाराष्ट्र सरकारच्या आदेशाने वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात येतो. यावर्षी शिवाजी विद्यापीठातील सर्व महाविद्यालया मध्ये मोठ्या प्रमाणात वर वाचन प्रेरणा दिन साजरा करण्याचे ठरवण्यात आले आहे. दि.१५ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० ते ११ या वेळेत महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी ,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्था चालक, माजी विद्यार्थी यांनी एकत्रितपणे वाचन प्रेरणा दिन साजरा करावयाचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षाचे औचित्य साधून यावेळी शिवराज्याभिषेका संबंधित विद्यापीठाने ठरवून दिलेल्या ग्रंथातील पानांचे वाचन सर्वांनी एकत्रितपणे करावयाचे आहे. या सर्वांचे व्हिडिओ शूटिंग,फोटो त्याचे एकत्रित कलेक्शन विद्यापीठामार्फत करण्यात येणार आहे. यासंबंधीचे वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न होणार आहे. सर्व महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी, माजी विद्यार्थी, प्राध्यापक, संस्थाचालक, कर्मचारी सर्वांनी यासाठी प्रयत्न करावेत तसेच मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे अधिसभा सदस्य संजय परमणे यांनी केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अशा प्रकारचा उपक्रम करण्यात यावा असा ठराव शिवाजी विद्यापीठाच्या फेब्रुवारी २४ मध्ये झालेल्या सिनेटच्या बैठकीत संजय परमणे यांनी मांडला. सर्वानुमते तो मंजूर झाला. त्याची अंमलबजावणी आता होत आहे. दिवसेंदिवस विद्यार्थ्यांच्या मधील वाचन संस्कृती कमी होत चाललेली दिसून येते यानिमित्ताने या वाचन संस्कृतीला चालना मिळावी तसेच शिवचरित्राचे वाचन विद्यार्थ्यांच्याकडून व्हावे या दुहेरी उद्देशाने हा उपक्रम यशस्वी ठरेल असे वाटते, शिवाजी विद्यापीठाचे ग्रंथालय विभाग तसेच एनएसएस विभाग हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करीत आहे असेही यावेळी सिनेट सदस्य संजय परमणे यांनी बोलताना सांगितले.