सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिका आयुक्तपदी शुभम गुप्ता रूजू
नागरिकांकडून पुष्पगुच्छ ऐवजी पुस्तके स्वीकारणार.

सांगली :- सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून शुभम गुप्ता (भा.प्र.से.) रूजू झाले. त्यांनी दि.८ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्याकडून पदभार स्वीकारला. महानगरपालिकेच्या कार्यालयात उपस्थित राहून मनपा आयुक्त शुभम गुप्ता यांनी कामकाज सुरू केले आहे. नागरिकांकडून पुष्पगुच्छ ऐवजी पुस्तके स्वीकारून ती मनपा शाळेमध्ये देण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ व चंद्रकांत खोसे, उपायुक्त वैभव साबळे, उपायुक्त शिल्पा दरेकर व संजीव ओहाळ यांच्यासह मनपा अधिकारी उपस्थित होते.