सहकार भारती व कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी साखर कारखाना संयुक्त विद्यमाने शेतकरी मेळावा संपन्न.

कोल्हापूर प्रतिनिधी :- सहकार भारती कोल्हापूर जिल्हा व कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना यांच्या संयुक्त विद्यमाने इचलकरंजी (हुपरी) येथील साखर कारखाना परिसरात सहकार भारती कोल्हापूर जिल्हा कार्यकारणी घोषणा व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला इचलकरंजीचे आमदार राहुल आवाडे, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री प्रकाशअण्णा आवाडे, सहकार भारतीचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री विवेक जुगादे, सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशाच्या महिला प्रमुख सौ. वैशालीताई आवाडे, कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष स्वप्निल आवाडे, राष्ट्रीय पतसंस्था प्रकोष्ठ प्रमुख शिरीष देशपांडे, कोल्हापूर विभाग सहप्रमुख जवाहर छाबडा, प्रदेश कार्यालय प्रमुख श्रीकांत पटवर्धन, जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे प्रबंध संचालक मनोहर जोशी, इफकोचे क्षेत्रीय व्यवस्थापक अशोक साकळे, सहकार खात्याचे माजी विभागीय सहनिबंधक अरुण काकडे, पतसंस्था प्रकोष्ठ प्रमुख सागर चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात इचलकरंजीचे नवनिर्वाचित आमदार राहुल आवाडे यांचा सहकार भारतीच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सर्व मान्यवरांची यथोचित भाषणे झाली. कार्यक्रमाला सहकार भारतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.