सांगली जिल्हा पोलीस दलातर्फे जागतिक योग दिन उत्साहात साजरा

सांगली प्रतिनिधी :- जागतिक योग दिन निमित्ताने दि.२१ जून रोजी सांगली जिल्हा पोलीस दलामार्फत पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांचे उपस्थितीत पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात योगासने करून योग दीन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी विविध पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार असे मिळून सुमारे 25 अधिकारी व 275 अंमलदार उपस्थित होते. तसेच मिरज विभागाचे पोलीस उपअधीक्षक प्रनील गिल्डा, सांगली विभागाचे पोलीस उपअधीक्षक आप्पासाहेब जाधव उपस्थित होते. यावेळी योग प्रशिक्षक अमेय पाटील, सौ. ज्योती अमेय पाटील व त्यांची टीमने योग साधनेचे धडे दिले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन राखीव पोलीस निरीक्षक पांडुरंग सूर्यवंशी. राखीव पोलीस उपनिरीक्षक श्री. पवार, श्री. पाटील यांनी केले.