सोलापूर पूरग्रस्तांसाठी सांगलीतून मदतीचा हात
आ. सुधीर गाडगीळ यांच्या पुढाकाराने ८०० अन्नधान्य किट्स, चादरी व चटई पाठविण्यात आल्या

सांगली :- सोलापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे नद्या दुथडी भरून वाहू लागल्या. त्यामुळे अनेक गावांमध्ये पाणी शिरून शेकडो कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले. नागरिकांच्या घरातील धान्यसाठा, कपडे, शाळकरी मुलांचे साहित्य वाहून गेले असून शेतकऱ्यांच्या पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. या बिकट परिस्थितीत सांगली जिल्ह्यातून मदतीचा मोठा हात पुढे करण्यात आला आहे. आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार सुधीरदादा गाडगीळ युवा मंच, सांगली जिल्हा तर्फे 500 अन्नधान्य किट्स, तसेच 250 चादरी व 230 चटई तसेच सांगली चेंबर ऑफ कॉमर्स, सांगली तर्फे 300 अन्नधान्य किट्स, चादरी व चटई असे एकूण 800 अन्नधान्य किट्स, तसेच 500 चादरी व 500 चटई असे पूरग्रस्तांसाठी मदत सामग्री पाठविण्यात आली. या मदतीमुळे पूरग्रस्तांना तातडीचा दिलासा मिळणार आहे. यावेळी आमदार सुधीर दादा गाडगीळ म्हणाले, “पूरग्रस्तांची वेदना आपली आहे. संकटाच्या काळात एकमेकांना मदत करणे ही आपली सामाजिक कर्तव्य आहे. समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन पूरग्रस्तांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. सांगली जिल्ह्यातून रवाना होत असलेली ही मदत ही केवळ एक सुरुवात आहे. पुढील काळातही आवश्यक त्या सर्व प्रकारच्या मदतीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत.” पूरग्रस्तांचे मदत करणं अशा कठीण प्रसंगी त्यांच्या पाठीशी उभा राहणं हे आपलं कर्तव्यच आहे. सोलापूर जिल्ह्यातील विविध भागांमध्ये ही मदत वाटप केली जाणार आहे. नागरिकांना दिलासा मिळावा, त्यांच्या संसाराची घडी पुन्हा बसावी यासाठी आणखी मोठ्या प्रमाणात मदतकार्य करण्याचे नियोजन असल्याचे आमदार गाडगीळ यांनी सांगितले.यावेळी आमदार सुधीरदादा गाडगीळ, माजी आमदार दिनकर पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, ज्येष्ठ नेते प्रकाश बिरजे, भाजपा किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार, शरद देशमुख, सुनील भोसले, माधुरी वसगडेकर, गणपत साळुंखे, लक्ष्मण नवलाई, राजेंद्र कुंभार, उत्तम साखळकर, सुबराव मद्रासी, अशोक शेट्टी, नितीन काका शिंदे, रवींद्र वादवणे, राहुल नवलाई, अमित देसाई, विजय साळुंखे, शुभम देसाई, श्रीकांत शिंदे, सविता मदने, प्रसाद वळकुंटे, प्रीती काळे, अरुणा बाबर यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.