वि.स.खांडेकर वाचनालयात जागतिक ग्रंथ दिन साजरा

सांगली प्रतिनिधी :- महानगरपालिका वि.स.खांडेकर वाचनालयाच्या सांस्कृतिक – शैक्षणिक कार्यक्रमांतर्गत जागतिक ग्रंथ दिन साजरा करण्यात आला यावेळी वि.स.खांडेकर वाचनालयामध्ये विविध विषयावरील मौलिक ग्रंथ, संदर्भ ग्रंथ, ग्रंथालय शास्त्राची पुस्तके, विद्यार्थी वर्गकरीता अभ्यासिके विषयी पुस्तके, इतर साहित्यांचे ग्रंथ प्रदर्शंन कार्यक्रमाच्या ठिकाणी दर्शनी भागात मांडून ग्रंथ प्रदर्शन घेणेत आले. यावेळी वाचनालयाचे ज्येष्ठ सभासद उपस्थित होते. यावेळी ग्रंथालयातील प्र.ग्रंथपाल शंकर भंडारी, राहूल मुळीक, सुनिता धाईजे, वर्षा धनवडे व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.