मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोथरुड मधील नागरिकांना दिले अक्षता वाटपाद्वारे निमंत्रण

पुणे प्रतिनिधी (जितेंद्र दळवी) :- उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे आज रामसेवेत तल्लीन झाल्याचे पाहायला मिळालं. मंत्री पाटील यांनी कोथरुड मतदारसंघातील शिवपार्वती आणि गिरीजा सोसायटीतील नागरिकांच्या घरी जाऊन अक्षता वाटपाद्वारे राम मंदिरात श्रीरामांच्या प्राण प्रतिष्ठापनेचे निमंत्रण दिले. सध्या संपूर्ण देशात अयोध्येतील भव्य मंदिरात प्रभू श्रीरामांच्या आगमनाची जय्यत तयारी सुरु आहे. ठिकठिकाणी अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून, प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी निमंत्रण दिले जात आहे. कोथरुड मध्येही प्रभू श्रीरामांच्या आगमनाची जय्यत तयारी सुरु आहे. अनेक मंदिरांमध्ये राम प्रतिष्ठापनेवेळी विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहेत. तसेच, प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा सर्वांना पाहता यावा; यासाठी अनेक मंदिरांमध्ये एलईडीची व्यवस्था करुन लाईव्ह प्रक्षेपण देखील करण्यात येणार आहे. मंत्री चंद्रकांतदादा पाटील हे देखील रामसेवेत सहभाग घेत आहेत. आज कोथरुडमधील शिवपार्वती आणि गिरीजा सोसायटीतील नागरिकांच्या घरोघरी जाऊन राम मंदिर अक्षता वाटप करुन निमंत्रण दिले. यावेळी नागरिकांकडूनही प्रभू श्रीरामांच्या आगमानाचा आनंद व्यक्त केला.