सांगली विधानसभा नमो चषक क्रीडा, सांस्कृतिक महोत्सवाला प्रारंभ.

आमदार सुधीर गाडगीळ यांचे संयोजन, विविध स्पर्धाचे आयोजन.

सांगली प्रतिनिधी :- आमदार सुधीर दादा गाडगीळ व भाजप सांगली विधानसभा यांच्या विद्यमाने आयोजित ‘ नमो चषक २०२४ ’ राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाला येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणा वर प्रारंभ झाला. क्रिकेट स्पर्धेसाठी 35 संघातील एकूण 550 खेळाडू सहभागी झाले आहेत. विधानसभा मतदार संघातील खेळाडूंना व्यासपीठ मिळावे, कौशल्याला वाव मिळण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. सांगली विधानसभा मतदारसंघातील स्थानिक खेळाडूंनी या स्पर्धांत सहभाग घेऊन आपले नैपुण्य सिध्द करावे, या उद्देशाने क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव आयोजित केला आहे. क्रिकेटसह कुस्ती, बॅडमिंटन, कबड्डी, खो-खो, बुध्दिबळ, कॅरम स्पर्धा होणार आहेत. तसेच चित्रकला, नृत्य, एकांकिका, गीत गायन स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले आहे.भाजपचे पश्चिम महाराष्ट्र विभाग समन्वयक शेखर इनामदार, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, मे.पु.ना.गाडगीळ ज्वेलर्सचे संचालक सिद्धार्थ गाडगीळ यांच्या हस्ते फुलपीच क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन झाले. शेखर इनामदार व सिध्दार्थ गाडगीळ यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. पीचवर दमदार फलंदाजी करुन खेळाडूंना प्रोत्साहित केले. यावेळी प्रकाश बिरजे, श्रीकांत शिंदे, नमो क्रिकेट स्पर्धेचे आयोजक इम्रान शेख, अमित देसाई, राजू कुंभार, सुजित राऊत, सूरज पवार, धनेश कातगडे, चेतन माडगूळकर, सुनील भोसले, अभिजित मिरासदार, सुभाष गडदे, सुजित काटे, अनिकेत बेळगावे, शांतीनाथ कर्वे, अभिषेक कुलकर्णी, अनिकेत खिलारे, अमित गडदे, राजूभाई पठाण, माधुरी वसगडेकर, प्रीती काळे, अश्विनी तारळेकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते व खेळाडू उपस्थित होते.