जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

सांगली दि. 26, (जि. मा. का.) : भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय, विजयनगर, सांगली येथे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी – कर्मचारी उपस्थित होते.