चिंतामणराव व्यापाऱ महाविद्यालयात मार्केट फेस्ट 2025 उपक्रमास प्रतिसाद

सांगली :- चिंतामणराव व्यापार महाविद्यालयाच्या वतीने आयोजित मार्केट फेस्ट 2025 या उपक्रमाचे आयोजन उत्साहात पार पडले. या फेस्टचे उद्घाटन उद्योजक धर्मेंद्र खिलारे यांच्या हस्ते झाले, तर प्रमुख उपस्थिती महाविद्यालय विकास समितीचे सदस्य रवींद्र ब्रम्हनाळकर सर यांनी लाभली. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. शार्दुल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वी झाला. मार्केट फेस्ट 2025 चे समन्वयक IQAC समन्वयक विजय साळुंके, प्रा. एन. के. आपटे, डॉ. महेंद्र बागुल, डॉ. किशोरकुमार भोसले, डॉ. आशिष पुराणिक, प्रा. लीना काक्रंबे, प्रा. विनायक पाटील, प्रा. पवन मनुरकर, प्रा. स्नेहा छत्रे, प्रा. गणेश सिंहासने, प्रा. सुशील बनसोडे यांच्यासह सर्व प्राध्यापक, कर्मचारी, माजी विद्यार्थी, पालक, तसेच विविध शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थी-विद्यार्थिनींची उपस्थिती होती. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी 40 स्टॉल्स सादर केले होते. या स्टॉल्समध्ये कीचेन, ड्रायफ्रूट्स, इन्विटेशन ज्वेलरी, सेंद्रिय गूळ, आईस्क्रीम, कोल्ड्रिंक्स, पेस्ट्री यांसारख्या विविध प्रकारांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या या स्टॉल्सवर विविध आधारांवर परीक्षण केले गेले आणि क्रमांक दिले जाणार आहेत. या मार्केट फेस्ट आयोजनासाठी आर्थिक सहाय्य डॉ. शार्दुल ठाकूर, डॉ. आशिष पुराणिक प्रा. लीना काक्रंबे प्रा. गजानन नागरगोजे व प्रा. चैतन्य कुलकर्णी यांनी केले.