चिंतामणराव व्यापार महाविद्यालयातर्फे इंडस्ट्रियल व्हिजिट उपक्रम

सांगली :- चिंतामणराव व्यापार महाविद्यालय तर्फे दि. 25 जानेवारी रोजी कनिष्ठ विभाग अंतर्गत इंडस्ट्रियल व्हिजिट (औद्योगिक क्षेत्र भेट) उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या अंतर्गत इयत्ता अकरावीचे विद्यार्थी व शिक्षक यांनी राजधानी बुक्स आणि मास इंजिनिअरिंग या दोन इंडस्ट्रियल युनिटला भेट दिली. सर्वप्रथम श्री. निखिल जैन यांच्या राजधानी बुक्स येथे झालेल्या भेटीत विद्यार्थ्यांनी वही तसेच रजिस्टर डायरी यासारख्या स्टेशनरी वस्तूंची निर्मिती त्याची प्रक्रिया दाखवण्यात आली, तसेच त्या वस्तूंचे मार्केटिंग कसे करतात, कच्चामाल कुठून येतो आणि या वस्तूंची खरेदी व विक्री कशी करतात याचे मार्गदर्शन करण्यात आले. त्याचबरोबर मास इंजिनिअरिंग या फर्नेस मॅन्युफॅक्चरिंग युनिटला भेट दिली. येथील भाग्यश्री लोहार व त्यांच्या टीमने विद्यार्थ्यांना फर्नेस कसे तयार करतात याबाबत मार्गदर्शन केले .आणि त्या फर्नेसची निर्मिती पासून त्याची मार्केटिंग व लॉजिस्टिक तसेच इम्पोर्ट व एक्स्पोर्ट इत्यादी बाबत येथील तज्ञांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी कॉलेजमधील स्टाफ प्रा.स्वाती निरलगी , प्रा. प्राची तारळेकर , प्रा. जितेंद्र विष्णू कांबळे. औद्योगिक भेटीचे आयोजक प्रा. वर्धमान भिलवडे, प्रा. ओंकार हातेकाट, प्रा. अनुप कुलकर्णी उपस्थित होते.