सांगली अर्बन बँकेच्या उद्योजक संवाद मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

कुपवाड एम.आय.डी.सी येथे झालेल्या उद्योजक संवाद मेळाव्यामध्ये मार्गदर्शन करताना जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापिका विद्या कुलकर्णी .

सांगली प्रतिनिधी :- सांगली अर्बन को ऑप बँक शाखा विश्रामबाग आणि कृष्णा व्हॅली चेम्बर्स यांच्या संयुक्त विद्यमाने उद्योजक संवाद मेळावा कृष्णा व्हॅली चेम्बर्स येथे आयोजित करण्यात आला होता. सवांद मेळाव्याचे स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष व सांगली अर्बन बँकेचे संचालक सतीश मालू यांनी केले. यावेळी जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापिका विद्या कुलकर्णी यांचा सांगली अर्बन बँकेचे अध्यक्ष गणेश गाडगीळ यांनी व कृष्णा व्हॅली चेंबरमार्फत सतीश मालू यांनी सत्कार केला. यावेळी बोलताना विद्या कुलकर्णी म्हणाल्या की प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत बँकांमार्फत कर्जपुरवठा केला जातो तसेच सदर कर्जावर अनुदान प्राप्त होते. समाजातील विविध घटक तसेच महीलांच्यासाठी शासनाच्या विविध योजना आहेत तरी सर्व उद्योजकांनी या योजनाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी शासनाच्या विविध योजनांची व मिळणाऱ्या अनुदानाची विस्तृतपणे माहिती दिली. यानंतर बँकेचे अध्यक्ष गणेश गाडगीळ यांनी सांगली अर्बन बँकेच्या कार्याविषयी विस्तृत माहिती दिली यावेळी त्यांनी उद्योजकांना असे आवाहन केले की उद्योजकांना बँक नेहमीच मदत करीत असते यापुढच्या काळातही बँक आपणास सहकार्य करत राहील. त्यांनी बँकेच्या विविध कर्ज योजनाचा आपण लाभ घ्यावा असे आवाहन केले. यावेळी बँकेचे सरव्यवस्थापक वासुदेव दिवेकर यांनी बँकेच्या विविध कर्ज योजनांची माहिती दिली. कार्यक्रमामध्ये उद्योजकांनी मनोगते व्यक्त केली. बँकेचे संचालक एच.वाय पाटील यांनी आभार मानले. सूत्रसंचालन संदीप कुलकर्णी यांनी केले. या कार्यक्रमास सांगली अर्बन बँकचे उपाध्यक्ष सी.ए श्रीपाद खिरे, संचालक अनंत मानवी, एच.वाय. पाटील, संजय धामणगावकर, संजय पाटील, रवींद्र भाकरे, सागर घोंगडे, बापू हरिदास, सौ.स्वाती करंदीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी उल्हास नायक, कृष्णा व्हॅली चेंबर्सचे संचालक रमेश आरवाडे, हरीभाऊ गुरव, अरुण भगत, हेमलता शिंदे, रागिणी पाटील, पांडुरंग रुपनर, राजगोंडा पाटील याचबरोबर उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.