नमो चषक चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्यातर्फे आयोजन.

सांगली प्रतिनिधी :- रविवार सकाळची प्रसन्न वेळ, आमराईत आज वेगळीच धांदल दिसत होती…पालक आपल्या चिमुकल्यांना घेऊन येत होते. चिमुकल्यांच्या चिवचिवटाने आमराई बहरत होती, बघता बघता सुमारे ४ हजार चिमुकले हातात कुंचला घेत विविध चित्रे कॅनव्हास वर रेखाटू लागले. या स्पर्धेचे उदघाटन आमदार सुधीर गाडगीळ यांच्याहस्ते झाले. यावेळी माजी आमदार नितीन शिंदे,मुन्ना कुरणे, गीतांजली ढोपे पाटील, उर्मिला बेलवलकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने बहुतांश शाळा-महाविद्यालयांना सुट्टी होती. या चित्रकला स्पर्धेसाठी आगाऊ नोंदणीही करण्यात आली होती. सुट्टी दिवशी पालक आपल्या मुलांना घेऊन आमराईत येत होते. सांगलीतील बहुतांश शाळा व महाविद्यालयाचा विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. मुलांच्या कलागुणांना वाव मिळवा म्हणून आमदार सुधीर गाडगीळ ह्यांनी स्पर्धेचे आयोजन केले. सुमारे ४ हजार ४२५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेत विक्रम केला. ‘पीएनजी’चे संचालक सिद्धार्थ गाडगीळ यांनी स्पर्धास्थळी भेट देऊन विध्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. अमित देसाई, अनिकेत बेळगावे, चेतन माडगूळकर, विश्वजित पाटील, अभिषेक कुलकर्णी, दशमेश सावंत यांनी स्पर्धेचे नियोजन केले. युवा मोर्चाचे सिद्धांत काटकर, प्रवीण जाधव, संदीप कुकडे, धनंजय पाटील,सिद्धार्थ विभुते, रविराज कुकडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी संयोजनात मदत केली.