चिंतामणराव महाविद्यालयात “मार्केट फेस्ट २०२५” चे आयोजन
सांगली :- चिंतामणराव वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने “मार्केट फेस्ट २०२५” या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना व्यावसायिक कौशल्ये आणि उद्योजकीय प्रेरणा मिळावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम बुधवार दि.२२ जानेवारी २०२५ रोजी स. ९ वाजता महाविद्यालयाच्या परिसरात होणार आहे. या मध्ये इ.११ वी, १२ वी, बी. कॉम., एम. कॉम., व बी. बी. ए. विभागातील विद्यार्थी सहभाग नोंदवणार आहेत. यात विविध खाद्यपदार्थ, ज्वेलरी, मोबाईल एक्सेसरीज, ड्रायफ्रूट्स, कस्टमाईज प्रिंटिंग अशा वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल आहेत. हा उपक्रम महाविद्यालयाचे विद्यार्थी, माजी विद्यार्थी, पालक व इतर सर्वांसाठी खुला आहे. तरी या मार्केट फेस्ट उपक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन चिंतामणराव व्यापार महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य यांच्यातर्फे करण्यात आले आहे.