लक्ष्मीनारायण ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचा रौप्य महोत्सवी सांगता समारंभ संपन्न.

कोल्हापूर प्रतिनिधी :- श्री लक्ष्मीनारायण ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था, नृसिंहवाडी या संस्थेचे दि. ३ सप्टेंबर २०२२ रोजी रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण झाले होते. यानिमित्त संस्थेतर्फे वर्षभरात जेष्ठ नागरीक सत्कार, रक्तदान शिबीर, सर्व रोग निदान शिबीर व आय.टी क्षेत्र व बँकींग या विषयावर व्याख्यान,सभासद व कर्मचारी प्रशिक्षण शिबीर इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले. मंगळवार दि.०९ जानेवारी २०२४ रोजी रौप्य महोत्सवी सांगता समारंभ आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी सांगली अर्बन को-ऑप बँक लि. चे चेअरमन गणेशराव गाडगीळ, श्री महालक्ष्मी को-ऑप बँक लि. कोल्हापूर याचे चेअरमन राजेंद्र किंकर व श्री भरत अर्बन को-ऑप बँक लि. जयसिंगपूर याचे चेअरमन डॉ. श्रीवर्धन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पतसंस्थेच्या व्हाईस चेअरमन कु. विजया बंडोपंत पुजारी यांनी प्रास्ताविक केले. तसेच पतसंस्थेचे चेअरमन सतिश नंदकुमार कोडणीकर यांनी संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षात झालेल्या कामाचा आढावा सांगितला. त्यानंतर सर्व मान्यवरांचे सत्कार करण्यात आले व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सभासदांना भेटवस्तू देण्यात आल्या. त्यानंतर सर्व प्रमुख मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी सभासद,खातेदार उपस्थित होते.