सांगली शहर जिल्हा भाजप मंडल अध्यक्ष निवडी संपन्न

सांगली प्रतिनिधी :- आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्या कार्यालयामध्ये दि २० एप्रिल रोजी भारतीय जनता पक्षाच्या सांगली शहर जिल्हा मंडल अध्यक्षांच्या नेमणुका जाहीर करण्यात आल्या. मंडल अध्यक्ष निवड करताना पक्ष नियमानुसार प्रत्येक मंडला मध्ये एक निवडणूक अधिकारी नेमून मंडलातील १७ प्रमुख पदाधिकाऱ्यांना भेटून त्यांच्याकडून तीन इच्छुक नावे बंद पाकिटा मध्ये घेण्यात आली. ही सर्व नावे प्रदेश कार्यालयाला पाठवण्यात आली आणि ज्या नावाला सगळ्यात जास्त पसंती होती अशा नावाची मंडल अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. सांगली शहर जिल्ह्यामध्ये संघटन पर्व कार्यक्रमांतर्गत प्राथमिक सदस्य नोंदणी मोठ्या प्रमाणावर करण्यात आली. त्यानंतर जवळपास पंधराशे सक्रिय सभासदांची नोंदणी करून ६२२ बूथ कमिट्या तयार करण्यात आल्या. या कमिटी मध्ये १२ सदस्य असून तीन महिला, दोन एससी, व एसटी सदस्य अशी रचना आहे. बुथ कमिटीची निवड झाल्यानंतर लोकशाही पद्धतीने बूथ अध्यक्ष निवडी करण्यात आल्या. सांगली शहर जिल्ह्यातील सांगली पाच आणि मिरज चार अशा नऊ मंडल अध्यक्षांची निवड करण्यात आली. सांगली विधानसभेतील नवनियुक्त पाच मंडल अध्यक्ष नावे – सांगली पश्चिम मंडल – रवींद्र विजय वादवणे, सांगली उत्तर मंडल- अमित विजय देसाई, सांगली मध्य मंडल – राहुल लक्ष्मण नवलाई, कुपवाड पूर्व मंडल – कृष्णा भीमराव राठोड, सांगली ग्रामीण मंडल – संतोष विठ्ठल सरगर. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार नितीन राजे शिंदे, जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, पृथ्वीराज भैय्या पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले व नूतन मंडल अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. निवडणूक निरीक्षक म्हणून मोहन वाटवे महेश दह्यारी व धनंजय कुलकर्णी यांनी काम बघितले. यावेळी प्रसिद्धी प्रमुख केदार खाडीलकर, सिद्धार्थ दादा गाडगीळ, कोषाध्यक्ष धनेश कातगडे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष गीतांजली ढोपे पाटील, ओबीसी मोर्चा राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य संगीताताई खोत, पांडुरंग कोरे, माधुरी वसगडेकर, स्मिता पवार, तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व नवनिर्वाचित अध्यक्ष उपस्थित होते.