फास्ट फूड विक्रेता संघटनेचा आमदार गाडगीळ यांना पाठिंबा

सांगली :- आमदार सुधीरदादा गाडगीळ यांना सांगली शहर फास्टफूड विक्रेता हातगाडी असोसिएशन (दयानंद हॉकर्स युनियन) यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. सुधीरदादा मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, अशी ग्वाही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना भेटून दिली. संघटनेचे अध्यक्ष सुरेश टेंगले, अशोक सरगर, रघुनाथ सरगर, असलम शेख, हेमंत गोताड, इस्माईल वाटमोरे पखाली, सचिन तावशी, प्रकाश इंगळे, अनिल धुमाळ, संतोष नरळे, राजू पाटील, सागर पाटील, प्रशांत कांबळे, यांनी सुधीरदादांना पाठिंब्याचे निवेदन दिले.फेरीवाला महामंडळ राज्य शासनाने स्थापन करावे, सांगलीत फूड कोर्ट उभे करावे, शंभर फुटी रोड तसेच एमएस ईबीबागेजवळ फूड कोर्ट स्थापन करावे, महापालिकेचे भुईभाडे कमी व्हावे,अशा मागण्या संघटनेने सुधीरदादांकडे केल्या. निवडणुकीनंतर या सर्व मागण्यांबाबत आपण राज्य शासन, महापालिका यांच्याकडे पाठपुरावा करू. त्या मार्गी लावू, असे आश्वासन सुधीरदादांनी यावेळी संघटनेला दिले. यावेळी माजी आमदार दिनकर पाटील, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य अविनाश मोहिते आदि उपस्थित होते.