सांगली अर्बन बँकेचा कमर्चारी मेळावा उत्साहात संपन्न.

सांगली प्रतिनिधी :- सांगली अर्बन बँकेचा कमर्चारी स्नेहसंवर्धन मेळावा दि.१४ जून रोजी सांगली येथील खरे क्लब हाउस येथे उत्साहात संपन्न झाला. यावेळी बँकेच्या सांगली, कोल्हापूर, सोलापूर,पुणे,मुंबई व मराठवाडा येथील शाखांमधील कर्मचारी वृंद उपस्थित होते. यावेळी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात ठेवी,कर्जे, शेअर्स, विमा ई. मध्ये व्यवसाय उद्दिष्टपूर्ती करणाऱ्या शाखा व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. मेळाव्याचा प्रारंभ दीपप्रज्वलन व बँक संस्थापक स्व.म.ह तथा अण्णा गोडबोले यांचे प्रतिमा पूजन करून झाला. प्रास्तावीक मुख्य कार्यकारी अधिकारी उल्हास नायक यांनी केले. यानंतर व्यवस्थापन मंडळ अध्यक्ष मा.गणेशराव गाडगीळ आणि बँकेचे अध्यक्ष सी.ए श्रीपाद खिरे यांनी उपस्थित कर्मचारी वर्गाला मार्गदर्शन केले. तसेच व्यवस्थापन मंडळ सदस्य जयंत काकतकर यांनी “बदलते बँकिंग” या विषयावर तसेच तज्ञ संचालक मा.विश्वास चितळे यांनी “सायबर सिक्युरिटी’ या विषयावर विस्तृत मार्गदर्शन केले. यावेळी अध्यक्ष सी.ए श्रीपाद खिरे, व्यवस्थापन मंडळ अध्यक्ष गणेशराव गाडगीळ, उपाध्यक्ष संजय पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी उल्हास नायक व संचालक मंडळ यांचे हस्ते उद्दिष्टपूर्ती केलेल्या शाखांना बक्षीस, प्रमाणपत्र व ट्रॉफी तसेच वैयक्तिक उद्दिष्टपूर्ती केलेल्या कर्मचारी यांना प्रोत्साहन रक्कम, प्रमाणपत्र, ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. यांनतर शाखा व्यवस्थापक आणि कर्मचारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. समारोप संचालक संजय धामणगावकर यांनी केला. यावेळी संचालक सी.ए अनंत मानवी, एच.वाय पाटील, संजय धामणगावकर, शैलेंद्र तेलंग, सागर घोंगडे, सतीश मालू, कालिदास हरिदास, रवींद्र भाकरे, सौ. अश्विनी आठवले, सौ. स्वाती करंदीकर, तज्ञ संचालक विश्वास चितळे, व्यवस्थापन मंडळ सदस्य जयंत काकतकर, मुख्य कार्यकारी अधिकारी उल्हास नायक, सरव्यवस्थापक वासुदेव दिवेकर आदि उपस्थित होते. संदीप कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

