डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आ.गाडगीळ यांच्या कार्यालयात विनम्र अभिवादन

सांगली (प्रतिनिधी):-भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात अभिवादन करण्यात आले. याप्रसिंगी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांच्या विचारांवर चालत सामाजिक विकासाचा संकल्प केला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांची जोपासना करून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला. यावेळी ज्येष्ठ नेते श्रीकांत शिंदे, स्थायी समिती सभापती अतुल माने, भाजपा अनुसूचित जाती प्रदेश उपाध्यक्ष प्रदीप कांबळे,मंडलाध्यक्ष रवींद्र वादवणे, जिल्हा सचिव उदय मुळे, गणपती साळुंखे, भूपाल सरगर, कुणाल संकपाळ, सुनील भोसले,गौस पठाण, आयुष देसाई यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
