सुहास वझे “कीर्तन चूडामणी” पदवीने सन्मानित.

पणजी – कीर्तनकार सुहास वझे यांना अखिल भारतीय कीर्तन संस्था दादर मुंबई या संस्थेच्या वतीने ‘कीर्तन चूडामणी’ ही पदवी देण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष माधव खरे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख २५ हजार देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले. दादर कीर्तन संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त हा कार्यक्रम संस्थेच्या सभागृहात झाला. कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष माधव खरे, सेक्रेटरी किशोर साठे, अभय सावरकर व रवींद्र आवदी तसेच ज्येष्ठ कीर्तनकार दया तेंडोलकर, माधवी घाग पवार, आकांक्षा प्रभू तसेच जयंत मिरिंगकर, संजय घाटे, दामोदर कामत, अर्चना प्रभू उपस्थित होते.
