भाजपची जिल्ह्यात संघटनात्मक शक्तीवर्धनासाठी महत्त्वपूर्ण बैठक संपन्न
बूथ सक्षमीकरण, विस्तार आणि आगामी रणनीतीवर सविस्तर मंथन

सांगली :- भारतीय जनता पक्ष, सांगली शहर व ग्रामीण यांच्या वतीने आज खरे सांस्कृतिक मंगल कार्यालय, सांगली येथे जिल्हास्तरीय संघटनात्मक अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. या बैठकीस भाजपा प्रदेश सरचिटणीस तथा विधानपरिषद आमदार निरंजन डावखरे, आमदार विक्रम पाचपुते तसेच भाजपा पश्चिम महाराष्ट्र सहसंयोजक विक्रम पावसकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या बैठकीत पक्ष संघटना अधिक मजबूत, सक्षम आणि जनसंपर्काभिमुख करण्याच्या दृष्टीने सविस्तर व व्यापक चर्चा करण्यात आली. आगामी काळातील विविध संघटनात्मक कार्यक्रमांचे नियोजन, पक्षविस्तार मोहिमा, बूथ स्तरावरील सक्षमीकरण, तसेच कार्यकर्त्यांमध्ये समन्वय वाढवून पक्षाची तळागाळातील पकड अधिक मजबूत करण्यावर विशेष भर देण्यात आला. केंद्र व राज्य शासनाच्या लोकहितकारी योजना प्रभावीपणे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविणे, तसेच पक्षाच्या विचारधारेचा व्यापक प्रसार करण्याच्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी अधिक सक्रिय भूमिका घ्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. याप्रसंगी सांगली शहर जिल्हा अध्यक्ष प्रकाश ढंग यांनी शहर जिल्ह्यातील संघटनात्मक आढावा सविस्तरपणे मांडला. तसेच सांगली ग्रामीण जिल्हा अध्यक्ष सम्राट महाडिक यांनी ग्रामीण भागातील संघटनात्मक प्रगती, बूथ रचना आणि कार्यकर्ता विस्तार याबाबत सविस्तर माहिती सादर केली. बैठकीदरम्यान सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संघटनात्मक शिस्त, कार्यपद्धतीतील पारदर्शकता आणि जनसंपर्क वाढविण्यासाठी एकत्रितपणे कार्य करण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला. आगामी निवडणूक तयारीच्या दृष्टीने बूथ स्तरापासून संघटन अधिक गतिमान करण्यावर विशेष भर देण्यात आला. बैठकीत संघटन विस्तार, नव्या कार्यकर्त्यांची जोडणी, बूथ समित्यांचे पुनर्गठन, तसेच स्थानिक पातळीवरील जनसंपर्क अभियान अधिक प्रभावी करण्यावर सखोल चर्चा करण्यात आली. पक्षाची विचारधारा अधिक मजबूत करत तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार सर्व पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला.कार्यक्रमाच्या शेवटी आगामी काळातील राजकीय व संघटनात्मक दिशा अधिक स्पष्ट करत, भाजपा सांगली जिल्हा अधिक सक्षम व गतिमान करण्याचा संकल्प करण्यात आला. यावेळी आमदार सुधीरदादा गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सत्यजित देशमुख, प्रदेश कार्यकारिणी सदस्य मकरंद देशपांडे, प्रदेश कार्यकारणी सदस्या नीता केळकर, जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, माजी आमदार दिनकर पाटील, नितीनराजे शिंदे,भगवान साळुंखे, कोल्हापुर पश्चिम जिल्हा प्रभारी पृथ्वीराज पाटील, पुणे जिल्हा प्रभारी शेखर इनामदार,शरद लाड, चिमणभाऊ डांगे, महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस स्वाती शिंदे, महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष्या सौ.स्वाती खाडे, विशाल पवार, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख केदार खाडिलकर, महापौर धीरज सूर्यवंशी, स्थायी समिती सभापती अतुल माने,गटनेता संदीप आवटी, सांगली जिल्हा परिषद गटनेता आशिष जाधव, आदी सर्व प्रदेश पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, नगरसेवक, भाजपा शहर आणि ग्रामीण पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
