सांगलीत भगवान परशुराम जयंती उत्सवाचे आयोजन

भगवान परशुराम जयंतीला सांगलीत ब्राह्मण समाजातर्फे शोभायात्रा आणि महाप्रसादाचे आयोजन.

सांगली :- सांगली जिल्ह्यातील ब्राह्मण समाज भगवान परशुराम जयंती उत्सव समितीच्या वतीने रविवार दि.१९ एप्रिल रोजी भगवान परशुराम जयंती आणि शोभायात्रा सोहळा साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने जिल्ह्यांतील ब्राह्मण समाज एकवटणार आहे. जन्मोत्सव सोहळा व शोभायात्रा यशस्वीतेसाठी विविध समित्या नेमून पूर्वतयारी करण्यात आली आहे. मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर आणि जिल्ह्यात अनेक गावात ब्राह्मण समाजाच्या व पोट जातीच्या संघटना आहेत. या सर्वांना निमंत्रीत करुन यंदा भगवान परशुराम जन्मोत्सव व शोभायात्रा काढण्याचा आणि ब्राह्मण समाजाच्या प्रगती, उन्नती साठी संघटीत स्थाई कार्य करणेचा निर्धार करणेत आला आहे. जिल्हात विविध भागात बैठका घेवून सोहळ्याची पूर्वतयारी केली गेली आहे. या निमित्ताने सांगली शहरातील प्रमुख मार्गांवरून एक शोभायात्रा काढली जाणार आहे या शोभायात्रेत सुंदर चित्ररथ, पारंपरिक वाद्ये, भगवे झेंडे आदींचा सहभाग असणार आहे. शोभायात्रेचे आयोजन – सांगलीतील मुख्य गणपती मंदिरापासून दुचाकी व चारचाकी वाहनातून दुपारी तीन वाजता सुरू झालेली शोभायात्रा प्रमुख मार्गावरून फिरून संध्याकाळी सहा वाजता विश्रामबाग येथील विलिंग्डन कॉलेज जवळील आयटी पार्क येथे येईल. या यात्रेचे मान्यवर स्वागत करतील. विलिंग्डन जवळ सायं. साडेसहा वाजता जन्मोत्सव, जन्म काळ साजरा करण्यात येवून महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता होईल.अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.