आ. सुधीर गाडगीळ जनसंपर्क कार्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी

सांगली :- छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आमदार सुधीरदादा गाडगीळ जनसंपर्क कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सिद्धार्थ गाडगीळ यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते तसेच नागरिक उपस्थित होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करण्यात आला. माजी नगरसेवक लक्ष्मण नवलाई, सुबरावतात्या मद्रासी, अतुल माने, उदय मुळे, सचिन बावडेकर, शितल कर्वे, माधुरी वसगडेकर, गणपती साळुंखे, गौस पठाण, अक्षय पाटील, सुजित काटे, आदी पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान सांगलीतील शिवतीर्थ येथेही सिद्धार्थदादा गाडगीळ यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले.