नागरिकांनी घाबरू नये, पण सतर्क राहून प्रशासनास सहकार्य करावे – जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

सांगली, दि.२७ (जि. मा. का.) : नागरिकांनी घाबरून जाऊ नये, पण सतर्कतेने पूर परिस्थितीत प्रशासनसोबत राहून कामकाज करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले. सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील पुर परिस्थितीचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी घेतला. यावेळी पोलीस अधीक्षक संदीप घुगे, मनपा आयुक्त शुभम गुप्ता यांच्यासह संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तत्पूर्वी जिल्ह्यात दाखल इंडियन आर्मीची तुकडी, एन. डी. आर. एफ व मनपा अग्निशमन दल यांनी पूर भागात मॉक ड्रिल करून आढावा घेतला . सध्या पूर बाधित क्षेत्रातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले आहे. जिल्हा प्रशासन,पोलीस यंत्रणा आणि मनपा प्रशासन यांच्या समन्वयाने पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक त्या सर्व बाबी पूर्ण केल्या आहेत. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचना पाळून सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले. पूर बाधित नागरिकांनी अधिकृत सुचनांचे पालन करावे, अफवांवर विश्वास ठेवू नये, कायदा सुव्यवस्था राखावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी केले तर मनपा आयुक्त शुभम गुप्ता म्हणाले, महापालिका क्षेत्रातील नागरिकांना मनपा प्रशासना कडून देण्यात आलेल्या सूचनांचे त्यांनी पालन करून मनपा प्रशासनास सहकार्य करावे तसेच मनपातर्फे निवारा केंद्रात सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे आयुक्त श्री. गुप्ता यांनी सांगितले .