नवहिंद प्रतिष्ठान तर्फे शिवजयंती उत्साहात साजरी

सांगली :- नळभाग येथील नवहिंद प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी डॉ. सतीश नाईक यांच्या हस्ते शिवप्रतिमेला पुष्पहार घालून वंदन करण्यात आले. याप्रसंगी नवहिंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष शंभूराज काटकर, उपाध्यक्ष संतोष तावशी, अनिकेत कराळे, अविनाश चव्हाण, शिवप्रताप काटक,र अझरुद्दीन मुल्ला, रायदीप काटकर, श्रीकृष्ण माने, ऋषिकेश चव्हाण, रवी पाळेकर, तन्मय चव्हाण, संदीप चाळके, आदी उपस्थित होते