जिल्हा प्रशासनाच्या वतीने संविधान दिन साजरा

सांगली :- दि. २६ रोजी संविधान दिना निमित्त जिल्हाधिकारी कार्यालय आवारात संविधान स्तंभास जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तद्नंतर जिल्हा नियोजन समिती सभागृहात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी स्वाती देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी आदि उपस्थित होते.