सांगलीत “शनिवारी विज्ञानवारी” कार्यशाळेस प्रतिसाद

सांगली प्रतिनिधी :- ‘शनिवारी विज्ञानवारी’ ही कार्यशाळा नवीनतम राष्ट्रीय शिक्षण कार्यक्रम (NEP) अंतर्गत आणि समुदाय प्रतिबद्धता कार्यक्रम या विषयास अनुसरून मराठी विज्ञान परिषद, मुंबई आणि सांगली यांच्या समन्वयाने वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातील द्वितीय वर्ष संगणक शाखेच्या विद्यार्थ्यांकरता आयोजित केली होती. दि. 24 व 25 ऑगस्ट रोजी ही कार्यशाळा वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयात संपन्न झाली. या कार्यशाळेत वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय व विलिंग्डन महाविद्यालय सांगली येथील 132 विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी सहभाग घेतला व साधारण 80 विविध विज्ञान प्रयोग स्वतः करून पाहिले व आत्मसात केले. यापुढे प्रशिक्षण घेतलेले विद्यार्थी हे ‘युवा विज्ञान प्रसारक’ या भूमिकेतून जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये जाऊन इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करणार आहेत. या उपक्रमासाठी वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संगणक शाखेचे प्रा. डॉ. अनिल सुर्वे आणि वालचंदचे तसेच मराठी विज्ञान परिषद सांगली जिल्हा संघटक व समन्वय सुनील देशपांडे यांच्या पुढाकाराने कार्यशाळेचे आयोजन यशस्वीरित्या पार पाडले.या कार्यक्रमासाठी विभाग प्रमुख डॉ.एम.ए शहा, ए.ए उरुणकर,व्ही.आर माळी,आर.जी पुजारी, प्रा.पडल, विद्यार्थी प्रतिनिधी यश किणीकर आणि वेदिका म्हाटकर यांचेही योगदान लाभले.
या कार्यशाळेसाठी मराठी विज्ञान परिषदेच्या मुंबई विभागातून प्रकाश मोडक सौ. सुचिता भिडे, सौ. अनघा वकटे, सौ. शुभदा वकटे आणि सचिन वानखेडे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या निरोप समारंभात सहभागी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यातून, नव्याने विज्ञानाची ओळख कृतीतून शिकायला मिळाली याबद्दल आनंद व्यक्त केला व पुढे जाऊन अनेक शाळांमध्ये पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना हे सर्व प्रयोग या अभियाना अंतर्गत जाऊन शिकवायचे आश्वासन दिले. या कार्यक्रमासाठी प्राज इंडस्ट्रीज, पुणे यांचे अर्थसहाय्य लाभले.