पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण

मिरज : विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे आणि आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध व्हावे, या उद्देशाने राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या वतीने प्रभाग क्रमांक ४, ५ व ७ मधील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वितरण कार्यक्रम आदर्श मंगल कार्यालय, मिरज येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमास जिल्हा नियोजन समिती सदस्य दीपक बाबा शिंदे (म्हैसाळकर), ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी, माजी महापौर संगीता खोत, नगरसेवक केदार खाडिलकर, नगरसेविका सौ. अपर्णा विवेक शेटे, डॉ.भालचंद्र साठ्ये, अॅड. अजिंक्य कुलकर्णी, संजय चौगुले तसेच रूपालीताई देसाई यांची प्रमुख उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. पालकमंत्री मा. नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या वतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीला बळ देणे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देणे हा होता. शिक्षण क्षेत्रासाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून पालकमंत्री महोदय सातत्याने कार्यरत असून विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी त्यांची भूमिका प्रेरणादायी राहिली आहे. या कार्यक्रमाचे नियोजन पालकमंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील टीम – योजना दूत यांच्या माध्यमातून करण्यात आले. मा. बाळासाहेब यादव (विशेष कार्य अधिकारी, पालकमंत्री मा. चंद्रकांत दादा पाटील) यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीवल्लभ कुलकर्णी, संकेत कुलकर्णी, मिलिंद भिडे, सचिन राहुटे, श्रीकृष्ण कुलकर्णी, गजानन गावडे तसेच योजना दूत टीमच्या सहकार्याने कार्यक्रमाचे नियोजन, समन्वय आणि अंमलबजावणी यशस्वीरीत्या करण्यात आली. या उपक्रमांतर्गत प्रभाग क्रमांक ४, ५ व ७ मधील इयत्ता १ ली ते ५ वीच्या विद्यार्थ्यांना ४१ संच तसेच इयत्ता ५ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना १३३ संच शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. अशा प्रकारे एकूण १७४ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचा लाभ मिळाला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत नियमित अभ्यास, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर जीवनात यश संपादन करण्याचा संदेश दिला. विद्यार्थी व पालकांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत पालकमंत्री मा. नामदार चंद्रकांत दादा पाटील यांचे आभार मानले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी राबविण्यात आलेला हा उपक्रम समाजोपयोगी आणि प्रेरणादायी ठरला. उपस्थित मान्यवर, योजना दूत टीम, कार्यकर्ते आणि सहकाऱ्यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
