स्व. बाळासाहेब गलगले यांच्या ११ व्या स्मृतीदिनानिमित्ताने ‘सेवा पुरस्कार’ घोषित

सांगली प्रतिनिधी – ज्येष्ठ समाजसेवक स्व.बाळासाहेब गलगले यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ स्थापन झालेल्या ल.वि. तथा बाळासाहेब गलगले फाऊंडेशनतर्फे यंदाचा वार्षिक ‘स्मृती सेवा पुरस्कार’ जाहीर झाला आहे. या पुरस्कारांमधून समाजाच्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान होणार आहे. “या पुरस्कार सोहळ्याचा हेतू म्हणजे कार्यकर्त्यांच्या समर्पणाचा गौरव आणि भावीपिढ्यांसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ प्रज्वलित करणे.” असे यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष सुहास कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत विजेत्यांची घोषणा करताना सांगितले. यंदाचे पुरस्कार विजेते – धर्मरक्षक पुरस्कार – जत चे आमदार गोपीचंद पडळकर, नगरसेवा पुरस्कार – मिरजेचे माजी नगरसेवक पांडुरंग कोरे, वृत्तसेवा पुरस्कार – दैनिक सकाळचे सहयोगी संपादक शेखर जोशी, सहकार सेवा पुरस्कार – बाबची (ता. जत) येथील उदयराव यादव, क्रीडासेवा पुरस्कार – करगणीचे तरुण खेळाडूव्रती सचिन खिलारे, शाहीर सेवा पुरस्कार – कवठेमहांकाळचे लोककला साधक अविष्कार देशिगे, पर्यावरण सेवा पुरस्कार – सांगलीतील पर्यावरणप्रेमी डॉ. मनोजकुमार पाटील. हा पुरस्कार सोहळा रविवार,दि.२४ ऑगस्ट २०२५ रोजी सांगली-कोल्हापूर मार्गावरील दैवज्ञ भवन येथे हा सोहळा पार पडणार आहे. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पिंपरी-चिंचवडचे आमदार महेशदादा लांडगे उपस्थित राहणार आहेत आणि अध्यक्षस्थानी भाजपाचे ज्येष्ठ नेते आण्णासाहेब डांगे विराजमान होतील. यावेळी आमदार सुरेशभाऊ खाडे, आमदार सुधीरदादा गाडगीळ, आमदार सत्यजीतभाऊ देशमुख तसेच आमदार सदाभाऊ खोत यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. या पत्रकार बैठकीस उपाध्यक्ष अरुण गडचे, ॲड. बाळासाहेब देशपांडे, श्रीकांत शिंदे, विजय कडणे, शाहीर नामदेव आलासे, रबिंद बादवणे, श्रीवल्लभ कुलकर्णी, अतुल कुलकर्णी, सुभाष कलगुटगी, विनायक भोसले आदी उपस्थित होते.